बार्शी तिथं सरशी..! गृहाविलगीकरणात ठेवलेले कोरोना बाधित रुग्ण राजरोसपणे फिरत आहेत...?



बार्शी/प्रतिनिधी;

बार्शी शहरातील विविध भाग कोरोनाचे हॉटस्पॉट होत आहेत . दाट लोकवस्तीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाधित रुग्ण आढळत आहेत रॅपिड टेस्ट वाढल्या आहेत त्या तुलनेत रुग्णही मोठ्या प्रमाणात सापडत आहे लक्षणे नसणाऱ्या रुग्णांना गृहाविलगीकरणात ठेवले जात आहे मात्र हे रुग्ण राजरोसपणे बाहेर फिरत आहेत अशा लोकांवर आजुबाजुच्या शेजाऱ्यांनीच नजर ठेऊन संबधित फिरत असलेल्या रुग्णा बाबत नगर पालिकास कळवावे असे आवाहन ही मुख्यधिकारी यांनी केले आहे.


तसेच बाजारपेठेत अनेक व्यापारीकडुन सामाजिक अंतरचे पालन होताना दिसत नाही. थर्मल गण , मास्क , सेनेटाईजर उपयोग होताना दिसत नाही व्यापाऱ्यांनी जर काळजी घेतली नाही तर नाईलाजस्तव दुकाने सिल करण्याचेही कारवाई करणार असल्याचे सांगितले तर नागरीकही कोरोना विषयक कसलीच काळजी घेताना दिसत नाही.

 सध्या काळजी करण्याची स्थिती आहे. गल्ली बोळात रेशन दुकानावर भाजीपाला साठी लोक गर्दी करत आहेत . नागरीकांनी कोरोनाला हलक्यात घेऊ नये लहानशी चुक ही आपल्याला धोका निर्माण करू शकते तर ६० वर्षापुढील नागरीक व जे इतर अजाराने ग्रस्त असणाऱ्या नागरिकांनीही विशेष काळजी घेण्याची गरज आहे .

Post a Comment

0 Comments