राकेश करमळकर/आजरा:
गेले काही दिवस आजरा तालुक्याच्या पश्चिम भागातील चाळोबा जंगलात फिरणार्या टस्कराने आपला मोर्चा सोहाळे परिसराकडे वळवला आहे. दोनच दिवसांपूर्वी टस्कर सोहाळे,सुलगाव व चोपडाई देवस्थानाच्या परिसरात फिरताना काही शेतकऱ्यांना दिसून आला आहे. त्यामुळे या परिसरात वावर करणारे शेतकरी भयभीत झाले आहेत.
गेले दोन दिवस या टस्कराने सोहाळे परिसरात उच्छाद मांडला आहे. या भागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. आज सकाळी या टस्कराने सुलगाव नजीक रांगी नावाच्या शेतामध्ये सोहाळे येथील शेतकरी विश्वास धोंडीबा कळेकर व मारुती धोंडिबा कळेकर यांच्या शेतातील पीक फस्त केले आहे. या शेतकऱ्यांच्या ३० गुंठे इतक्या शेत्रातील पिकाचे सुमारे ५० हजार रुपये इतके नुकसान केले आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेल्या या पिकाचे नुकसान झाल्यामुळे या भागातील शेतकरी हवालदिल झाला आहे. हत्तीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळावे अशी मागणी या शेतकऱ्यांकडून होत आहे.
0 Comments