मुंबई महानगरपालिकेच्या विरोधीपक्ष नेते पदावर दावा करणाऱ्या भाजपला मोठा झटका बसला आहे. भाजपच्या वाट्याला विरोधी पक्षनेतेपदही मिळालेलं नाही.
भाजपने याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली, मात्र न्यायालयाने ही याचिका फेटाळली. हे विरोधीपक्षनेते पद काँग्रेसकडे देण्यात आलंय.
भाजपकडून नगरसेवक प्रभाकर शिंदे यांच्या नावाची विरोधी पक्षनेतेपदासाठी आणि गटनेतेपदासाठी शिफारस करण्यात आली होती. मात्र महापौर पेडणेकर यांनी काँग्रेसचा विरोधी पक्षनेता नेमला.
0 Comments