आजऱ्यात भावपूर्ण वातावरणात सार्वजनिक गणरायाचे विसर्जन ; कोविड योद्ध्यांचा केला सत्कार


     
राकेश करमळकर/आजरा:

आजरा येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळच्या गणरायाचे आज भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. कोरोना सदृश्य परिस्थिती पाहता आजरा येथे एक गाव एक गणपती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार शंभर वर्षाची परंपरा असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने रवळनाथ मंदिर येथे गणेशाची स्थापना  केली होती. 

आजरा येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कायमच अनोख्या उपक्रमांसाठी तालुक्यांमध्ये नावाजले जाते. सलग तीन वेळा गणराया अवॉर्ड जिंकून त्याने तालुक्यामध्ये इतिहास रचला आहे. यावर्षी त्यांनी गणेश उत्सवाची परंपरा कायम ठेवली आहे.
         
यावर्षी कोरोना सदृश्य परिस्थिती असल्यामुळे मंडळाला कोणताच उपक्रम करता आला नाही म्हणून या मंडळाने कोरोनाशी दोन हात करणाऱ्या प्रशासनातील कोरोना योद्ध्यांचा गौरव केला. आमदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते या कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक फर्नांडिस, तालुका आरोग्य अधिकारी यशवंत सोनवणे, डॉ. रश्मी राऊत, सहाय्यक पोलीस अधीक्षक बालाजी भांगे यांचा यात समावेश आहे.सायंकाळी पारंपरिक वाद्याच्या गजरात सार्वजनिक गणेशाचे विसर्जन करण्यात आले.

Post a Comment

0 Comments