बेलगाव येथील क्रांती बहुद्देशीय संस्थेच्या वतीने गावातील विविध गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि कोरोनाच्या महामारीला लढा देण्यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांना प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळावी या हेतूने, विविध स्तरातून प्राविण्य मिळवून आपल्या गावाचे नाव उज्वल केलेल्या संदीप शेळके, प्रदीप शेळके, प्रतीक पाटील, अनिकेत शेळके, साक्षी शेळके या विद्यार्थ्यांचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.त्याचबरोबर कोरोनासारख्या महामारीवर मात करण्यासाठी श्रेष्ठ दान, रक्तदान याचा नारा लावत गावातील ४२ युवकांनी रक्तदान करून एकप्रकारे कोविड योध्याची भूमिका बजावली.
याप्रसंगी भगवंत रक्तपेढी बार्शीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पोलीस उपनिरीक्षक सचिन शेळके तर प्रमुख पाहुणे म्हणून स्वामिनी बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष विक्रांत पवार, सरपंच परसराम कांबळे, उपसरपंच किशोर तावरे, माजी सरपंच सुधाकर शेळके, क्रांती बहुद्देशीय संस्थेचे संस्थापक / अध्यक्ष धिरज शेळके, भगवंत रक्तपेढीचे गणेश जगदाळे, मुख्याध्यापक सुहास पाटील, नाडे सर, सातनाक सर, घाडगे सर, गावातील युवक, विद्यार्थी, पालक आणि नागरिक उपस्थित होते.
0 Comments