बीड : राज्य सरकारने अडचणीत असलेले साखर कारखाने सुरू व्हावेत यासाठी थकहमी देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महाविकास आघाडी सरकारने राज्यातील अडचणीत असलेल्या ३४ सहकारी साखर कारखान्यांना ३९१ कोटी रुपयांची थकहमी दिली आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील परळी येथील वैद्यनाथ साखर कारखान्याच्या थकहमीवरुन भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांच्यात आता जुंपली आहे. परळीतल्या वैद्यनाथ कारखान्याला दिलेल्या थकहमीवरुन धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे भावाबहिणीत पुन्हा श्रेयाची लढाई दिसून येत आहे. सुडाचे राजकारण न करता शेतकऱ्यांसाठी ११ कोटी रुपयांची थकहमी दिल्याचा दावा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केला आहे.
त्या कारखान्याला मदत कशी दिली गेली असा प्रश्न येतो. पण जेव्हा मदत दिली गेली तेव्हा आम्ही सूडाचे राजकारण केलेले नाही. भलेही ५ वर्ष आम्हाला या सूडबुद्धीच्या राजकारणाचे बळी व्हावे लागले, तरीसुद्धा आम्ही सत्तेत आल्यानंतर असे राजकारण करणार नाही हे आम्ही ठरवलं आहे, अशी प्रतिक्रिया सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली
0 Comments