महाविकास आघाडी सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा; केंद्रीय मंत्री रामदास आठवले


मुंबई ; बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणावतच्या वादानंतर शिवसेनेच्या काही शिवसैनिकांनी एका माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण केल्यानं सर्वत्र वातावरण ढवळून निघालं आहे. ह्या काळामध्ये केंद्रीय मंत्री आणि रिपाईचे नेते रामदास आठवले यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.

शिवसैनिकांनी माजी नौदल अधिकाऱ्याला केलेल्या मारहाणीला शिवसेनेने समर्थन दर्शवल आहे. अभिनेत्री कंगणा राणावतलाही यांचा अंमली पदार्थांच्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं आठवलेंनी म्हटलं आहे. दरम्यान, शिवसेनेला विरोधी पक्ष भाजपनेही या प्रकरणावरून धारेवर धरलं आहे. 

राज्यातील शिवसेनेच्या नेतृत्वाखाली काम करत असलेलं शिवसेनेचं सरकार सुडबुद्धीचं राजकारण करत आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण गढूळ झाल्याने राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

Post a Comment

0 Comments