बार्शी/प्रतिनिधी;
कोरोनाच्या संकटामध्ये ज्या शेतकऱ्यांनी देशाची अर्थव्यवस्था तारली आज त्याच शेतकऱ्यांचं जगणं मुश्कील झालंय. अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झालंय. यावर्षी पेरणी पासूनच पिकांवर संकटं आली. बोगस बियाने विकून कंपणी व व्यापाऱ्यांनी सुरुवातीला शेतकऱ्यांना लुटले. त्या संकटावर मात करून शेतकऱ्यांनी दुबार तिबार पेरणी केली. पण पीक हातात पडायच्या वेळेस अतिवृष्टीमुळे पीकं गेली.
काही शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीमुळे पीकविमा ही काढता आलेला नाही. या शेती हंगामात सातत्याने पडत असलेल्या पावसा दरम्यान शेतकरर्यांनी नैसर्गिक आपत्तीचा सामना करत कशीबशी सोयाबीन व उडीद पिकाची पेरणी केली. परतीच्या पावसामुळे शेतकरी आणखीनच हवालदिल झाले आहे. पावसामुळे शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेले सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.शेतकर्यांचा यावर्षी चा संपूर्ण बजेटच बिघडला आहे . पिक ओली झाल्यामूळे सोयाबीन पिकाची गुणवत्ता ढासळली आहे त्याचा परिणाम मूल्यावर पडून शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.
__________________________________________
📢
(Advertise)
__________________________________________
शेतकर्यांची एकूण संकट परिस्थिती लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना बार्शी तालुकाच्या वतीने नुकसान ग्रस्त शेतकर्यांच्या समस्या जाणून घेत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तहसीलदारांच्या भेटी घेत भिजलेली खराब झालेली पिक दाखवत त्यांनादेखील निवेदने सादर करण्यात आले, व शेतकर्यांच्या पिक नूकसानीचे पंचनामे करून आठवडाभरात शेतकर्यांना आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी मनसे तालुका यांच्यावतीने करण्यात आली व मागणी पूर्ण न झाल्यास तिव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला. यावेळी मनसे तालुका अध्यक्ष निखिल रणदिवे,वैराग विभाग अध्यक्ष बाबा शेख , तालुका उपाध्यक्ष अप्पा घाटे, सोलापुर शहर अध्यक्ष अक्षय घोंडगे, पशुमिया पठाण ,पांडुरंग जाधव आदी उपस्थित होते.
0 Comments