राज्यांच्या राजकारणात मोठी खळबळ उडणार अशी शक्यता आहे, भाजपचा मोठा नेता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी कार्यालयात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात बैठक सुरु आहे. उत्तर महाराष्ट्रातील नेता पक्षात घेण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीला गुलाबराव देवकर, आमदार अनिल भाईदास पाटील देखील उपस्थित आहेत.या नेत्याच्या प्रवेशाबाबत स्थानिक नेत्यांची काय भूमिका आहे, पक्षातील प्रमुख नेत्यांचं काय म्हणणं आहे, याबाबत या बैठकीत खलबतं सुरु आहे.
__________________________________________
📢
_______________________________________
उत्तर महाराष्ट्रातील कोणता नेता 'घड्याळ' बांधणार?
उत्तर महाराष्ट्रातील मोठा नेता म्हणजे एकनाथ खडसे यांच्या नावाचीच सर्वाधिक चर्चा आहे. शिवाय एकनाथ खडसे मोठ्या काळापासून भाजपवर नाराज आहेत. त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे एकनाथ खडसेच तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर नाहीत ना अशा चर्चांना उधाण आलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसेंनी आपली अस्वस्थता वांरवार व्यक्त केली आहे. मध्यंतरीच्या काळात त्यांनी केलेली व्यक्तव्ये आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली उत्तरं पाहता एकनाथ खडसे आता निर्णायक टप्प्यापर्यंत आलेले आहेत असं दिसतं.
0 Comments