करमाळा/प्रतिनिधी: करमाळा शहरातील सावंत गल्ली येथे आज राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे आदेशानुसार आपले कुटुंब माझी जबाबदारीचे उदघाटन तहसीलदार समीर माने यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, मुख्याधिकारी वीणा पवार, उपजिल्हा रुग्णालयाचे प्रमुख डाॅ अमोल डुकरे, नगरसेवक तथा बांधकाम समिती चे सभापती संजय सावंत, करमाळा अर्बन बॅंकेचे माजी उपाध्यक्ष फारूक जमादार, फारूक बेग, मार्तंड सुरवसे,नागेश उबाळे, डाॅ संकेत सावंत, आरोग्य विभागाचे प्रमुख जब्बार खान आदी जण उपस्थित होते.
यावेळी तहसीलदार माने म्हणाले की, करमाळा शहर व तालुक्यात सर्वच नागरिकांनी स्वतः ची अॅटीजेन टेस्टिंग करून घ्यावी, तसेच आज शहरात सर्व नागरिकांची ऑक्सिजन व थर्मल टेस्टिंग करण्यात येणार असुन सर्व नागरिकांनी तपासणी करून घ्यावी असे आवाहन माने यांनी केली.
------------------------------------------------------------------
📢
(Advertise)
_________________________________________
यावेळी मुख्याधिकारी वीणा पवार म्हणाल्या, नागरिकांनी स्वतः ची व कुटुंबाची काळजी घ्यावी सर्वानी अॅटीजेन, रॅपीट टेस्टिंग करून घ्यावी. तसेच मास्कचा वापर करावा वेळोवेळी हात स्वच्छ धुवावा सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिसटेंशनचे पालन करावे असे आवाहन केले.
यावेळी घरोघरी जाऊन करमाळा नगरपालिकेचे कर्मचारी आरोग्य अधिकारी नागरिकांची ऑक्सिजन व थर्मल टेस्टिंग तपासणी करत आहे.
0 Comments