"अति तिथं माती" म्हणत, नीलेश राणेंची शिवसेनेवर जहरी टिका.....

  

मुंबई: नाणार रिफायनरी प्रकल्पावरून शिवसेनेवर अनेक आरोप 'शिवसेनेचा अंत जवळ आलाय,' असं भाकीत त्यांनी वर्तवलं आहे. राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून राणे कुटुंबीय सातत्यानं शिवसेनेला लक्ष्य करत आहेत. माजी खासदार नितेश राणे पुन्हा एकदा शिवसेनेवर तोफ डागली.

 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये शिवसेनेवर होणाऱ्या आरोपांच्या निमित्तानं नीलेश राणे यांनी एक ट्वीट केलं आहे. सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण, करोना साथीची परिस्थिती, कोविड सेंटरमधील भ्रष्टाचार, बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण अशा सर्वच प्रकरणात नीलेश राणे हे ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवत आहेत. विशेषत: मुख्यमंत्री व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना लक्ष्य करत आहेत. 

त्यानंतर आज एका वृत्तपत्रात आलेल्या बातमीचं कात्रण नीलेश राणे यांनी सोशल मीडियात शेअर केलं आहे. 'शिवसेना उपनेत्याच्या मुलाची मुंबई पोलिसांकडून ड्रग्ज प्रकरणी चौकशी' अशी ही बातमी आहे. या बातमीचा संदर्भ देत नीलेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. 'एकेकाळी शिवसेनेची काय ओळख होती आणि आता काय झाली आहे. बलात्कारी, ड्रग्ज व्यापारी, खंडणी मागणारे, खून प्रकरण, ही आजच्या शिवसेनेची ओळख झाली आहे. ‘अति तिथे माती...' अशी एक म्हण मराठीत आहे. शिवसेनेचा अंत जवळ आलाय,' असं त्यांनी म्हटलं आहे.

Post a Comment

0 Comments