उजनी धरण ओव्होर फ्लो; उजनीतून विसर्ग पाण्याचा सुरू



सोलापूर जिल्ह्याची वारदायिनी असलेले उजनी धरण आज बुधवारी पूर्ण क्षमतेने भरुन ओव्होर फ्लो झाले आहे. आज बुधवारी राञी नऊ वाजता धरणाचे ४ दरवाजे ३५ सें.मीटरने उचलून ५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपाञात सुरु करण्यात आला आहे. तर नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

खडकवासला, मुळशी, पवना यासारख्या धरणातून पाणी सोडले जात असल्याने पाणी जलाशयात मिसळत होते तर प्रकल्प १०२ टक्के भरला आहे. धरणात आता एकूण साठा हा ११८ टीएमसी इतका झाला आहे. यात ५८.५० टीएमसी पाणी उपयुक्त पातळीत आहे. धरण भरल्याने लाभक्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे. हा प्रकल्प क्षमतेने भरल्याने पुढील वर्षापर्यंतची चिंता आता मिटली आहे. यातच लाभक्षेत्र असणार्‍या सोलापूर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाला आहे.

उजनीतून सोडलेला पाण्याचा विसर्ग

सीना-माढा उपसा – २९९ क्युसेक
दहीगाव उपसा – १०५ क्युसेक
कालवा – २४०० क्युसेक
बोगदा – ९०० क्युसेक
विजनिर्मिती ..१६०० क्युसेक
भीमा नदीपाञात – ५००० क्युसेक

Post a Comment

0 Comments