स्वच्छतेसाठी दर्गा गल्ली येथील युवकाचा आदर्शवत उपक्रम


राकेश करमळकर/आजरा:

आजरा येथील दर्गा गल्ली येथील मशिदीच्या बाजूच्या गल्लीमध्ये अरुंद रस्ता व रस्त्यातील अडथळ्यांमुळे नगरपंचायतीची घंटागाडी तेथे जाऊ शकत नव्हती. त्यामुळे या भागांमध्ये आरोग्य व स्वच्छतेचे प्रश्न निर्माण होत होता.यासाठी दर्गा गल्ली येथील रहिवाशी समीर मुल्ला व स्थानिक कार्यकर्त्यांनी यांनी पुढाकार घेऊन रस्त्यामधील अडथळा दूर करून कायमस्वरूपी घंटागाडी चालू करण्यासाठी प्रयत्न केला आहे. रस्त्यामध्ये नागरिकांनी वाहने लावू नयेत म्हणून जागृती ही केली आहे . या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाने व नगरपंचायतीच्या सहकार्याने या भागांमध्ये घंटागाडी सुरू करण्यात आली आहे त्यामुळे गल्लीमध्ये पडणारा नकचऱ्याचा प्रश्‍न आता निकाली निघाला आहे.
        
घंटागाडी गल्लीमध्ये कचरा गोळा करण्यास आली असता या भागातील लोकांनी घंटागाडीला सजवून चालक संतोष कांबळे व इतर कर्मचाऱ्यांचा सत्कार केला याप्रसंगी बाबाजान माणगावकर, साहिल माणगावकर,समीर फुलवाले, साहिल खलीफ, रहिमतुल्ला वंटमुरे, साहेबलाल तकीलदर, यासह गल्लीतील कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments