क्षण आठवणीतले...जगताना नव्याने जगायला लावणारे



✒️सागर माने 
संचालक:श्री हालमत सांप्रदाय मंडळ,कुपवाड ,सांगली.

          
मित्रांनो आयुष्य हे एक भेळ आहे.ओळखी अनोळखी माणसांचा मेळ आहे.नाती जुळली तर कायमची नाळ आहे. माझ्या आयुष्यात या धनगरी कलेला वाहून घेऊन १४ वर्ष होऊन गेली.या न संपणाऱ्या वाटेवर वेगवेगळ्या तऱ्हेची मानस मला भेटत गेली.ते माझे...मी त्यांचा होत गेलो.काही जगायला शिकवून गेली तरी काही का जगायचं सांगून गेली.काही वाईट अनुभव देऊन गेली तर काही मधाची गोडी बोटावर ठेऊन गेली.सगळी आपलीच मानस पण अनुभव मात्र वेगवेगळे..या देवाचं जस गुणगान गात आलो आहे तस जगाला काही मिळालं आहे की नाही हे सांगता येणार नाही (प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असू शकतात),पण माझ्या आयुष्यात मात्र खरच बदल होत गेला.कस वागावं ,चार चौघात कस बोलावं,कोणत्याही परस्थितीमध्ये दोन्ही बाजूचा कसा विचार करावा.अध्यात्मामध्ये इतकी प्रचंड सकारात्मक ऊर्जा आहे ती आपण ही अनुभूती घ्यावी..या कलेमुळेच आम्हाला या गोष्टी समजू शकल्या.नंतर काय ज्या क्षत्राशी आपण एकनिष्ठ आणि प्रामाणिक राहतो तेव्हाच आपल्याला त्यातील मर्म समजत त्याच्याविषयी प्रेम होत.
        
गोष्ट २०१६ ची.मे महिन्यात श्री बिरदेव जयंतीला आपल्या ग्रुपच्यावतीने आपण मांगुर (ता.निपाणी) येथे आपल www.haalmat.org हे app चे उद्धाटन केले. महिन्याभरातच त्या अॅपचे भरपूर लोकांनी वाचन केले.संपूर्ण महाराष्ट्र भरातून लोकांनी फोन केला.त्यांना आपल्या अँप मधून नवनवीन माहिती मिळाली अनेक गोष्टीचा खुलासा झाला. फोटोतून ही आपण इतिहासाला उजाळा दिला.शिवाय भावी कार्यासाठी शुभेच्छा ही बऱ्याच लोकांनी संशोधकांनी दिल्या.तसाच फोन प्रा.म्हस्के सरांचा आला.नावं,गाव, ग्रूप सुरू करण्याचा उद्देश,ग्रुपचे कार्य अशा अनेक विषयावर चांगली तासभर चर्चा झाली. तेव्हापासुन सरांची आणि आमची ओळख झाली.ओळखीचं रूपांतर चांगल्या वैचारिक मैत्रीत झालं.पण आपल्या ग्रुपला मला आणि प्रा.म्हस्के सरांना एक घट्ट पकडून ठेवणारा धागा म्हणजे बिरोबा. आणि त्यांचा अध्यात्मिक,मौखिक,आणि संशोधनपर अभ्यास.एव्हाना सरांनी अभ्यास करायला सुरवात करून २० वर्ष होऊन गेली होती.सरांचा अभ्यास रुपी ग्रंथ अंतीम टप्प्यात आला होता.अजूनही ही सरांना माहिती मिळवायची होती.त्यासाठी सरांनी आपल्या ग्रुपची सन २०१७ ची अभ्यास दौरा सहल केली महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील श्री बिरोबा मंदिर पहिली. तेथील परंपरा,धार्मिक विधी,पेहराव,पुजा पद्धती,मौखिक संस्कृती,मंदिराची जुनी बांधकाम शैली,रीतिरिवाज,नवनवीन मानस अशा सगळ्यांची सरांनी नव्याने ओळख करून घेतली.आपल्या ग्रुपचे हे कार्य गेली ७ वर्ष अवीरतपणे अविश्रांत सुरू आहे.त्याचा सरानी आपल्या ग्रंथामध्ये उल्लेख केला आहे.
             
आम्ही पण आयकून होतो की नगर ,नाशिक,बीड, लातुर, उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये  देखील बिरोबाची जुनी ठाणी आहेत म्हणून.मग आम्ही२०१८ साली त्या भागातील अभ्यास सहल करण्याचे ठरवले.त्यावेळी अगदी ५ दिवस सरांनी आपल्या ग्रूमधील ४० लोकांनी सर्व व्यवस्था केली.ज्या गावात आम्ही जाईल तिथे लोकांनी आमचे जंगी स्वागत केले.रांगोळी, हार तुरे,रोज जेवणाची पंगत.मग आमचा रात्रभर ओव्यांचा कार्यक्रम चाले.सर अगदी जातीनिशी आपले व्यक्तिगत काम मागे सारून आमच्या सोबत पळत होते.त्यांनीच त्या भागातील.सर्व बिरोबाची जुनी ठाणी,परंपरा,धार्मिक विधी,मौखिक परंपरा.अशा अनेक गोष्टींची माहिती दिली.ती अभ्यास सहल कायम स्मरणात राहील.
 
१९/०९/२०१९ गुरु बिरोबा देवांच्या  पालख्यांचे  प्रस्थान आणि सरांच्या अभ्यास पूर्ण ग्रंथाचे प्रकाशन..हे उद्याच्या भागात.
      
क्रमशः....
  

Post a Comment

0 Comments