वात जळते मेणाची...


✒️अमितकुमार पवार

पेटत राहते, तेवत राहते,
उभी जळते लाहीलाही...
अशी ही कहाणी,
बाई जातीची...

कसे सांगू तुला मी,
वात जळते मेणाची..!!१!!

अनंत या वेदना सोसत,
संपण्याच्या कळा...
रोज पेटते अखंड जळते,
होते ती आक्रोशाची बळी...

कसे सांगू तुला मी,
वात जळते मेणाची...!!२!!

रोज नवी जागा रोज नवा अंधार नशिबी तिच्या,
रोज असते नवी काडी..
धडपड ही तिची जगण्याची,
मरणाच्या दाराकडची....

कसे सांगू तुला मी,
वात जळते मेणाची...!!३!!

वाटेवरचा त्रास वेगळा,
प्रत्येकाचा तिच्याकडे बघण्याचा
बाज वेगळा...
काय काय सांगू,ही तर जुनीच
जणू थट्टाच तिच्या जन्माची...

कसे सांगू तुला मी,
वात जळते मेणाची...!!४!!


Post a Comment

4 Comments