कोल्हापूर जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशात सीपीआर रुग्णालय हे या कोरोनाबधित रुग्णांसाठी आशेचा किरण बनल आहे. सध्या या रुग्णालयातील ट्रॉमा केअर सेंटर मध्ये १५ कोरोना रुग्णांनावर उपचार सुरू होते. मात्र आज पहाटे अचानक लागलेल्या आगीनंतर याठिकाणी एकच कल्लोळ माजला.अग्निशामक दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नाने या रुग्णांना इथून दुसरीकडे हलवले. रुग्णांना हलवून दुसऱ्या विभागात नेतानाच दोन रुग्णांचा अंत झाला. तर इतर दोघांचा यानंतर उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
जिल्हाधिकारी श्री दौलत देसाई यांनी या संपूर्ण प्रकरणाची तात्काळ चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र या घटनेमुळे रुग्णांची सुरक्षितता धोक्यात आली असल्याचे निष्पन्न झाले आहे. सोबतच सीपीआर रुग्णालयाचे तातडीने फायर ऑडिट करण्याचे आदेशही जिल्हा प्रशासनाने जारी केले आहेत.
0 Comments