ब्रेकिंग:नियम बदलणार ड्रायव्हिंग लायसन्सपासून ई -चलनपर्यंत




गाडी चालवताना खोटे कागदपत्र दाखवून ट्रॅफीक पोलिसांकडून सुटका करता येऊ शकते असा अनेकांचा गैरसमज आहे. पण यापुढे असं होणार नाही. आता वाहतूक पोलिसांकडे तुमची कागदपत्रे आधीच असतील. त्यामुळे खोटी कागदपत्रे दाखवून तुमची सुटका होऊ शकणार नाही.

केंद्र सरकारने मोटर वाहन नियम १९८९ मध्ये संशोधन केले आहे. १ ऑक्टोबर २०२० पासून वाहतूक संदर्भातील नियमांमध्ये महत्वाचे बदल केले आहे. ड्रायव्हींग लायसन्स आणि ई चलनसहित वाहनांशी संबधित कागदपत्रांची पडताळणी होणार आहे. इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये अधिकृत आढळलेल्या कागदपत्रांची पुन्हा पडताळणी होणार नाही.
________________________________________
📢
(Advertise)
_________________________________________

ट्रॅफीक पोलिसांकडे तुमच्या ड्रायव्हींग लायसन्स संदर्भातील सर्व माहीती आधीच असणार आहे. तसेच रद्द किंवा अवैध झालेल्या लायसन्सची माहिती देखील यावर असणार आहे. ही माहीती वेळोवेळी अपडेट केली जाणार आहे. 

Post a Comment

0 Comments