करमाळा/प्रतिनिधी:
केंद्र सरकारने १४ सप्टेंबर, २०२० रोजी कांद्यावर निर्यातबंदीचा निर्णय जाहीर केला, हा निर्णय जाहीर करून सरकारने शेतकर्यांची घोर निराशा केली. या निर्णयाचा फेरविचार करून सरकारने कांदा निर्यात बंदी उठवावी, अशी मागणी "शेतकरी कामगार संघर्ष समिती" च्या वतीने करण्यात आली आहे. संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष दशरथ अण्णा कांबळे यांनी केली आहे.
केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केली आहे. शेतकऱ्यांना सतत कांदा पिकांमध्ये तोटा होत आहे, कांदा शेती परवडत नाही, परंतु हे सरकार शेतकऱ्यांच्या क्रूर चेष्टा करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना दुप्पट भाऊ अशी घोषणा केली होती. परंतु ती घोषणा पोकळ ठरले आहे, केंद्र सरकारचा करमाळा शेतकरी कामगार संघर्ष समितीच्या वतीने जाहीर निषेध करीत आहोत. या बैठकीला अण्णासाहेब सुपनवर, अनिल तेली, भागवत दुधे, सुनील खाडे, आप्पा भोसले, शहाजी ठोसर आदी उपस्थित होते
0 Comments