सुशांतसिंह राजपूत, कंगना राणावत प्रकरणे गाजू लागल्यावर निर्माण झालेला राजकीय पेच सोडवण्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कामाला लागले. पण प्रकरणांची बारीक छाननी केल्यावर लक्षात आले की यात गुंतलेले लोक त्यांचेच निकटवर्तीय आहेत. सुशांतसिंह प्रकरण आत्महत्येचे आहे असे जाहीर करणारे गृहमंत्री अनिल देशमुख राष्ट्रवादी पक्षाचे.
कंगनाशी वाग्युद्धात गुंतलेले संजय राऊतही पवारांशी सलगी राखून आहेत. मुंबई पोलिसांनी सुशांत प्रकरणाचा विचका केला म्हणावे तर गृहखाते राष्ट्रवादीकडेच आहे. बिहारचे एनडीए नेते यात उतरले. त्यांनी परिस्थितीचा पुरा फायदा उठवला.
दिल्लीची अंतस्थ वर्तुळे सांगतात की, राऊत यांचे बॉस भले उद्धव ठाकरे असतील; पण ते पवारांना अधिक जवळचे आहेत. राऊत उद्धव यांच्यावर अनेक कारणांनी नाराज आहेत. ठाकरे ना राऊतांना बोलू शकत ना देशमुखांना वेसण घालू शकत ! अर्थात ही गोष्ट वेगळी की ठाकरेंनी मौन सोडले नाही आणि महापालिकेने हे प्रकरण नीट हाताळले नाही, म्हणूनच सगळा विचका झाला!
0 Comments