केएल राहुलला अनेकांची पहिली पसंती....
महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून १५ ऑगस्टला अचानक निवृत्ती स्वीकारली. २०१९च्या जुलै महिन्यात तो शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता, त्यानंतर त्याला संघात स्थान न मिळाल्याने अखेर त्याने १५ ऑगस्ट २०२०ला निवृत्तीची घोषणा केली.
धोनीने निवृत्ती पत्करल्यानंतर आता मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याचा वारसदार कोण? ही चर्चा जोर धरू लागली आहे. ऋषभ पंत जरी त्याची जागा घेण्यासाठी उत्सुक असला तरी फलंदाजी आणि यष्टीरक्षण अशा दोन्ही आघाड्यांनवर यशस्वी ठरणाऱ्या केएल राहुलला अनेकांची पहिली पसंती आहे. राहुलने संघात धोनीची जागा घेण्याबाबत मत व्यक्त केलं आहे.
पत्रकारांच्या एका समुहाशी झूम कॉलच्या माध्यमातून राहुलने संपर्क साधला. संघात धोनीची जागा घेणं हा विचार माझं चित्त विचलीत करत नाही. पण एक मात्र नक्की की संघातील धोनीची जागा ही कोणीही खेळाडू घेऊच शकणार नाही, असं माझं प्रामाणिक मत आहे", असं राहुल म्हणाला.
एखादी भूमिका पार पाडण्याचे माझ्यात सामर्थ्य असेल म्हणून मला ते काम देण्यात येईल आणि त्याचा मला अभिमान असेल. त्यामुळे ती भूमिका बजावताना मी द्विधा मनस्थितीत राहणार नाही. माझ्या मनात संघातील भूमिकेबाबत स्पष्टता आहे आणि मी मला शक्य तितकी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न नक्कीच करेन", असेही राहुलने नमूद केले.
0 Comments