बार्शीत मराठा आरक्षण आंदोलनाला शंभर टक्के प्रतिसाद; तर राऊतांनी राजकारण सोडण्याचा दिला इशारा



मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवारी जिल्हा बंदचे आवाहन केले होते़ या बंदला विविध पक्षीय नेते, विविध समाजाच्या संघटना, व्यापारी संघटना यांनी पाठिंबा दिला होता़ त्यामुळे या बंदला बार्शी शहर व जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला़ सोमवारी सकाळपासून मराठा समाजातील विविध कार्यकर्त्यांनी आमदार राजेंद्र राऊत यांच्या घरासमोर आसूड ओढ आंदोलन केले. बंदला ही शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.

 बार्शीत एक युवकाने टाकीवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आमदार राजेंद्र राऊत यांनी राजकारण सोडण्याचा तर सुभाष देशमुखांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचा ईशारा दिला. मराठा समाजाला आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाल्याने मराठा समाज प्रचंड आक्रमक झाला आहे़ आरक्षणासाठी सोलापूर जिल्हा बंद ची हाक दिल्याने या बंद ला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून संबंध जिल्ह्यात याचा परिणाम पहायला मिळत आहे.

आमदार राजेंद्र राऊत यांनी तर राजकारण सोडण्याचा इशारा दिला, पुढील काळात आरक्षण जर दिले नाही कार्यकर्ते अधिक आक्रमक होतील असा इशारा सकळ मराठा समाजाने दिला.


 

Post a Comment

0 Comments