मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करावा : संभाजी ब्रिगेड


संभाजी ब्रिगेडने मराठा आरक्षणावर आपली भूमिका आणि मागणी असल्याचं निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना पाठवलं आहे. त्यामुळे मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.

१९९१ पासून आमची हीच मागणी आहे आणि हेच आरक्षण टिकेल. हा निर्णय करणं महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीत आहे. महाराष्ट्र सरकारने त्वरित निर्णय घ्यावा अन्यथा संभाजी ब्रिगेड संवैधानिक मार्गाने तीव्र आंदोलन करेल, असं संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे येथून पुढे ओबीसी समावेशासाठी लढा उभा केला जाणार आहे, असं शिवानंद भानुसे यांनी म्हटलंय.



Post a Comment

0 Comments