राज्य लोकसेवा आयोगाचे सुधारित वेळापत्रक जाहीर ; राज्यसेवा पूर्वपरीक्षा होणार आता 'या' तारखेस

गेल्या अनेक महिन्यांपासून तीनवेळा पुढे ढकलण्यात येणाऱ्या राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक आज नव्याने जाहीर करण्यात आले आहे. एप्रिल व मे महिन्यात होणाऱ्या या परीक्षा कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अजूनही घेण्यात आलेल्या नाहीत. मात्र आता नव्याने वेळापत्रक आल्यामुळे विद्यार्थी पुन्हा तयारीस लागले आहेत.
या नव्या परिपत्रकानुसार २० सप्टेंबर रोजी घेण्यात येणार राज्यसेवा पूर्वपरीक्षा ही आता ११ ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे. तर संयुक्त गट ब पूर्वपरीक्षा ही ११ ऑक्टोबर ऐवजी २२ नोव्हेंबर रोजी घेण्याचे प्रस्तावित केले आहे. महाराष्ट्र  अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा ही १ नोव्हेंबरलाच पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार होणार आहे.

सतत पुढे ढकलण्यात येणाऱ्या या परीक्षांच्या तारखांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. मात्र तरीही विद्यार्थी पुन्हा जोमाने परीक्षांची तयारी सुरू करतील अशी अपेक्षा स्पर्धा परीक्षा तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments