सोलापूर,दि.१४: महाराष्ट्र शासनाच्या अपंग कल्याण आयुक्तालय, पुणे अंतर्गत अपंग (अस्थिव्यंग) बालकांसाठी मोफत शिक्षण, वसतीगृह व गरजेनुसार अस्थिव्यंगोपचार शस्त्राक्रिया व कृत्रिम अवयव सुविधा पुरविणारी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव शासकीय निवासी संस्था किल्ला भाग मिरज येथे कार्यरत असून २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. प्रवेशासाठी त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन शासकीय अपंग बालकगृह व शाळेचे अधीक्षकांनी केले आहे.
शिक्षण सुविधा
• संस्थेच्या परिसरात १ ली ते ४ थीपर्यंतचे मोफत प्राथमिक शिक्षण
• इयत्ता ५ वीपासून पुढील शिक्षण माध्यमिक शाळेपर्यंत.
• माध्यमिक शाळेत जाणे येणेसाठी मोफत वाहतुकीची सुविधा.
• पाठ्यपुस्तके, वह्या, इतर शैक्षणिक साहित्य व शालेय गणवेश मोफत.
• मुलींसाठी विशेष काळजी घेण्यासाठी महिला काळजीवाहक.
वसतीगृह सुविधा
• वसतीगृहात अपंग मुला-मुलींची स्वतंत्र निवास व्यवस्था आणि मोफत जेवण.
• प्रत्येक विद्यार्थ्यांना कॉट, गादी, बिछाना आणि इतर साहित्याचा मोफत पुरवठा.
• दररोज अंघोळीसाठी गरम पाण्याची सोय
• शुद्ध व थंडगार पिण्याच्या पाण्याची सुविधा
शस्त्रक्रिया भौतिकोपचार सुविधा
• अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार गरजेनुसार शस्त्रक्रिया व भौतिकोपचाराची सुविधा.
• गरजेनुसार कृत्रिम अवयव, कुबड्या, तीन चाकी सायकल वाटप.
प्रवेशाबाबत अटी
• विद्यार्थी अस्थिव्यंग असला पाहिजे.
• वयोगट ६ ते १४ वर्षे.
• प्रवेश अर्जासोबत सिव्हील सर्जन यांनी दिलेल्या अपंगत्वाचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, तीन फोटो.
• प्रवेश अर्ज व माहितीपत्रक समक्ष अथवा पोस्टाद्वारे मोफत मिळतील.
अधिक माहितीसाठी अधीक्षक, शासकीय अपंग बालगृह व शाळा, किल्ला भाग, बी.एस.एन.एल ऑफिस शेजारी, मिरज- ४१६४१०(संपर्क क्र- ९३२५५५५९८१,९८६०६४२६६८,९४२२२१६४५५९ )
0 Comments