देशात कोरोनाबाधितांची संख्या ६० लाखांवर


 देशात कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत असताना देखील दिलासा देणारी बाब म्हणजे देशातील कोरोना या धोकादायक विषाणूवर मात करणाऱ्यांची संख्या अधिक आहे.

आज देशात देशात कोरोनाबाधितांची संख्या ६० लाखांवर पोहोचली आहे, तर ५० लाख १६ हजार ५२१ रुग्ण कोरोनाच्या विषाणूतून सुखरूप बाहेर पडले आहेत.देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६० लाख ७४ हजार ७०३ इतकी झाली आहे.

गेल्या २४ तासांत देशात नव्या ८२ हजार १७० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर १ हजार ३९ जणांचा मृत्यू झाला आहे.तर आतापर्यंत या धोकादायक विषाणूने ९५ लाख ५४२ रुग्णांचा बळी घेतला असून सध्या ९ लाख ६२ हजार ६४० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

 

Post a Comment

0 Comments