सोलापूर : सोलापुरातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात कोरोना बाधितांना ठेवण्यात आलं होतं. मुलींच्या वसतीगृहात असलेल्या कोव्हिड सेंटरमधील कपाटांचे कुलुप तोडून साहित्यांची नासधूस केलीय. इतकचं नाही तर कागदपत्र आणि पैशांची चोरी केल्याचा आरोप विद्यार्थींनी केला आहे.
याठिकाणी सोलापूर जिल्हा कारागृहातील कोरोना बाधित आणि संशयित कैद्यांना उपचारासाठी ठेवण्यात आलं होते. सर्व कैदी डिस्चार्ज झाल्यानंतर इतर रुग्णांसाठी देखील या कोव्हिड सेंटरचा वापर केला जातोय. मात्र, कोरोनावर उपचार घेण्यासाठी दाखल झालेल्या या रुग्णांनी असा काही प्रकार केलाय की ते पाहून तुमच्या पायाची आग मस्तकात जाईल.
__________________________________________
📢
__________________________________________
अचानक लॉकडाऊन झाल्याने सर्व विद्यार्थ्यांना आपल्या गावी जावं लागलं. किती दिवस लॉकडाऊन असणार याची खात्री नसल्याने वसतीगृहात राहणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी आपले साहित्य वसतीगृहातच ठेवले. मात्र, तात्पुरता जेल म्हणून शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह अधिगृहीत करण्यात आले. वसतीगृहात विद्यार्थिंनींनी आपल्या कपाटातच साहित्य ठेवले होते. ज्यात महत्वाची कागदपत्रे, कपडे, पैसे इत्यादी होते. मात्र, कपाटाचे कुलूप तोडून त्यामधील साहित्यांची नासधूस करण्यात आलीय. महत्वाचे कागदपत्रे फाडण्यात आली, काही जणांचे पैसे आणि इतर साहित्य देखील चोरीला गेलंय. लाजीरवाणी बाब म्हणजे मुलींच्या कपड्यांवर अश्लील शेरेबाजी आणि मोबाईलनंबर देखील लिहिण्यात आलेत. तर विद्यार्थिंनींच्या रुममध्ये दारुच्या बाटल्या देखील आढळून आल्या आहेत.
0 Comments