मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज मराठवाड्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी पुढीलप्रमाणे मुद्दे मांडले....



"माझे कुटुंब, माझी जबाबदारी" ही मोहिम आता सगळीकडे प्रभावीपणे राबविली जाईल असा विश्वास वाटतो आहे. यात ज्यांना-ज्यांना महाराष्ट्र आपले कुटुंब वाटते ते सर्व सहभागी होतील. माझ्या महाराष्ट्राची आणि महाराष्ट्राच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ते या मोहिमेत सहभागी होतील.

मराठवाड्यात टेस्टिंगचे प्रमाण वाढविणे आवश्यक आहे. आरटी-पीसीआर टेस्टची संख्या वाढविणे आवश्यक आहे. ज्यांची अँटीजेन टेस्ट निगेटीव्ह आली असेल आणि लक्षणे असतील त्यांची आरटी-पीसीआर टेस्ट होणे आवश्यक आहे. त्यांचे दोन द्राव्य (Swab) घेण्याचे सांगितले आहे.

जगभर आता कोरोना प्रादुर्भावाची दुसरी लाट येईल असे म्हटले जात आहे. कारण आर्थिक चक्र फिरवण्यासाठी तरूण पिढी कामावर जाऊ लागली आहे. पण त्यांच्यामुळे घरच्या ज्येष्ठांपर्यंत विषाणू पोहचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळेच आता आपल्याला जनजागृतीवर मोठा भर द्यावा लागणार आहे.

ब्रिटेनमध्ये मास्क न वापरण्यांना मोठा दंड करणे सुरु केले आहे. त्यामुळे आपल्याकडेही आता बाहेर पडताना मास्क घातलाच पाहिजे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी दंड करणेही आवश्यक असेल, तर तेही प्रभावीपणे केले पाहिजे.

"माझे कुटंब, माझी जबाबदारी" मोहिम प्रभावीपणे राबविणे गरजेचे आहे.मी सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित हा मोहिमेचा गाभा आहे, त्यामुळे आपल्याला जनजागृती, ट्रेसिंग व टेस्टिंगवर भर द्यावा लागणार आहे. डॉक्टरला रुग्ण वेळेत मिळणे व रुग्णाला डॉक्टर सोबत औषधे मिळणे यांची सांगड घालावी लागणार आहे.

कोरोना होऊन गेल्यानंतरच्या उपचारातही काळजी घ्यावी लागणार आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात आपण आरोग्य विभागाचा टास्कफोर्स तयार केला आहे. या टास्कफोर्सने निसंकोचपणे राज्यस्तरावरील टास्कफोर्सशी संपर्क साधावा. यातून राज्यातील मृत्यूदर कमी रहावा यासाठी करता येतील,ते सर्व प्रयत्न करावेत.

"माझे कुटुंब, माझी जबाबदारी" मोहिम देशातील नव्हे, जगातील आरोग्य चळवळ ठरेल असा विश्वास आहे, यात आपल्याला जनतेचा सहभाग वाढवायचा आहे. प्रत्येक कुटंबातील प्रत्येक सदस्याची काळजी आपण घेणार आहोत. हात-पाय धुणे,स्वच्छतेची काळजी घेणे अशा सूचना ग्रामीण भागापर्यंत व तळागाळापर्यंत पोहचविण्याची गरज आहे.

लॉकडाऊन हवे की जीवनशैली बदलणे परवडेल हे लोकांना पटवून द्यायला हवे. लॉकडाऊनमुळे जगाचेच अर्थचक्र बिघडले आहे. त्यामुळे अर्थकारणाची गाडी पुन्हा रुळावर आणण्यासाठी जीनवशैलीतील बदलl स्विकारावे लागतील. स्वचःची काळजी घेऊन कामांसाठी बाहेर पडावे लागेल.

Post a Comment

0 Comments