पंढरपूर/प्रतिनिधी:
मोफत उपचाराच्या खोट्या जाहिराती देऊन रुग्णांची फसवणूक करणा-या लाईफ लाईन हॉस्पिटल विरोधात सम्यक क्रांती मंच चे अध्यक्ष प्रशांत लोंढे यांचे अमरण उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरूच ठेवले आहे. परंतु प्रशासनाकडून विषयाचा विपर्यास करीत कारवाईस टाळाटाळ करण्यासाठी वेळकाढूपणाचे धोरण स्वीकारले जात आहे. या प्रकाराने व्यथित होऊन, अनेक सामाजिक संघटनांचा उद्रेक वाढत आहे.
संबंधित संघटनांनी प्रत्यक्ष उपविभागीय अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदने दिली असून या प्रकरणी त्वरित कारवाई न झाल्यास लोटांगण आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. दरम्यान दिवसभरात पंढरपूर शहर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण पवार यांनी आपल्या सहकाऱ्यांसह उपोषणस्थळी येऊन उपोषण कर्त्याचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर घोडके मॅडम यांनी उपोषणकर्त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता, उपोषण कर्ते प्रशांत लोंढे यांची प्रकृती खालावत असल्याचे निदर्शनास आले. दरम्यान प्रशासनाकडुन मुख्य विषयाला बगल देण्यासाठी भलतीच चौकशीचा फार्स सुरु ठेवला आहे.
असे पंढरपूर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार यांच्यामार्फत होत असलेल्या मध्यस्थी वरुन स्पष्ट होत आहे. त्यामुळे प्रशासनाकडुन या संबंधी न्याय मिळण्याची आशा धूसर होत चालली असल्याची खंत व्यक्त होत आहे. अशावेळी उपोषणकर्ते प्रशांत लोंढे यांनी संबंधितांवर जोपर्यंत तक्रार दाखल होत नाही. तोपर्यंत उपोषण चालू ठेवण्याचा निर्धार पक्का असल्याचे सांगण्यात आले.
0 Comments