वैराग कोविड सेंटरच्या भोंगळ कारभाराविरुद्ध मनसे उठविला आवाज; मनसेच्या पदाधिकारी स्वतः परिसर केला स्वच्छ


वैराग/प्रतिनिधी;

कोविड केअर सेंटरमधून दररोज निघणाऱ्या बायो मेडिकल वेस्टची (जैविक कचरा) नियमित विल्हेवाट लावली जात नाही. परिणामी या केंद्राच्या आतील भागात बायो मेडिकल वेस्टचा खच पडला आहे. परिणामी यापासूनच अधिक संसर्ग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पण याकडे कुणाचेही लक्ष नाही. याच कारणामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना बार्शी तर्फे वैराग कोविड सेंटर च्या भोंगळ कारभाराविरुद्ध वारंवार आवाज उठवला होता.

त्यामुळे गटविकास अधिकारी श्री.सावंत यांनी तात्काळ मिटिंग लावुन कोविड सेंटर बाहेरील अस्वच्छता दुर करण्या बाबतीत आदेश दिला होता. पण कोणाची ही वाट न पाहता  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व  पदाधिकारी मिळुन कोविड सेंटर बाहेरील स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्यावेळेस निखिल रणदिवे ,बाबा शेख ,बापूसाहेब घोडके, बाजीराव कारंडे ,प्रदीप निलाखे, पशुमिया पठाण ,उपस्थित होते

Post a Comment

0 Comments