सोलापूर मधील एसटी सेवा बंद ठेवण्याचे आदेश ; जिल्हाधिकारी शंभरकर

सोलापूर/प्रतिनिधी:

मराठा आरक्षण स्थगिती २१ सप्टेंबरला सोलापूर जिल्हा बंद

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी व स्थगिती उठवण्यासाठी मराठा समाजाच्या वतीने सोमवारी २१ सप्टेंबर रोजी सोलापूर शहर व संपूर्ण जिल्हा बंद करण्याचे हाक दिली आहे, त्याच पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, एसटीचे नुकसान होऊ नये म्हणून सोमवारी एसटी बंदचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे राज्यभरातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्यातच २१सप्टेंबरला सकल मराठा समाजाने सोलापूर बंदची हाक दिली आहे. विविध पद्धतीने मराठा समाजाने ह्या निर्णयाचा निषेध नोंदवला आहे.

त्याकाळात एसटीचे तोडफोड होऊ नये, म्हणून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी संपूर्ण दिवसभर एस टी सेवा बंद ठेवायचा निर्णय घेतला.

Post a Comment

0 Comments