एकनाथ खडसेंना शिवसेनेत येण्याची बड्या नेत्यांची ऑफर



भाजपामधील नाराज ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना मंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत यांनी शिवसेनेत येण्याची ऑफर दिली आहे.सध्या खडसे व देवेंद्र फडणवीस यांच्यात वाकयुद्ध चालू आहे.त्यावर बोलताना सामंत म्हणाले, “एका ज्येष्ठ नेत्यावर जर भाजपामध्ये अशी वेळ येत असेल तर ते दुर्देवी आहे, हा त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे. परंतू भविष्यात जर ते कोणत्या पक्षाचा विचार करत असतील तर त्यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाचा विचार करण्यास हरकत नाही.”

दरम्यान, एकनाथ खडसे यांनी वारंवार माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर उघडपणे टीका केली आहे. “या महाराष्ट्रात मला एकाच व्यक्तीनं छळलं ते म्हणजे देवेंद्र फडणवीस. मुख्यमंत्री असताना त्यांनी काय काय उद्योग केले हे मला माहिती आहे. उगाचच मला बदनाम करुन तिकीट न देण्यामध्ये त्यांचाच हात होता” असा थेट आरोप खडसे यांनी केला आहे. खडसेंची ही नाराजी लक्षात घेता उदय सामंत यांनी त्यांना भविष्यात शिवसेनेत येण्याची ऑफर दिली आहे.

Post a Comment

0 Comments