....अखेर त्या शिवद्रोह्याविरूद्ध छत्रपती क्रांती सेनेच्या वतीने सोलापूरात गुन्हा दाखल!


सोलापूर: आमचे आदर्श कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक लोकराजे छ. शिवाजी महाराजांची बदनामी करण्याचे दुष्ट हेतू आणि उद्देशाने प्रेरित होऊन भिलवाडा (राजस्थान) येथील युरेशियन ब्राम्हण ताराचंद खेतावत याने त्याचे फेसबुक अकाऊंट वरुन छ. शिवाजी महाराजांच्या वेशातील नरेंद्र मोदी यांचा फोटो प्रसारीत केला. 

असे करुन त्याने नरेंद्र मोदीची छ. शिवाजी महाराजांबरोबर अनाठायी तुलना केली आहे. त्यामुळे तमाम मुलनिवासी बहुजनांच्या भावना व निष्ठा दुखावल्या गेल्या म्हणून त्याचे विरुद्ध सोलापूर येथील छत्रपती क्रांती सेनेचे कार्यकर्ते मा. अशोक गायकवाड यांनी विजापूर नाका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
      
 इंडियन लाॅयर्स असोसिएशनचे ॲड सीताराम सोनवले, ॲड विक्रमसिंह काटूळे,ॲड पवन भालेदार, ॲड सैफन शेख, ॲड श्रीनिवास दावणे, ॲड चंद्रसेन गायकवाड व अशोक गायकवाड आदींनी पोलिस अधिका-यांशी कायदेविषयक बाबींवर चर्चा करुन गुन्हा दाखल केला.

Post a Comment

0 Comments