आजपासून लालपरी १०० टक्के प्रवासी घेऊन धावणार, मात्र हे नियम पाळावे लागतील!



मुंबई- लाॅकडाऊनमध्ये  बंद असलेली लालपरी काही दिवसांपुर्वी ५० टक्के प्रवाशी घेत सुरु करण्यात आली होती. मात्र उद्यापासून लालपरी १०० टक्के प्रवासी घेऊन धावणार आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने गुरुवारी परिपत्रक काढून याची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.

५० टक्के प्रवासी क्षमतेनं सुरू असलेल्या सेवेमुळे महामंडळ तोट्यात जात आहे. रोजचा खर्च निघणे कठीण झाले. दोन महिन्यापासून कर्मचाऱ्यांना पगार मिळालेले नाहीत. त्यामुळे पुढील काळात आर्थिक बाजू आणखी खराब होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याच्या सूचना महामंडळाकडून देण्यात आल्या आहेत. उद्यापासून एसटी बसमधून १०० टक्के क्षमतेनं प्रवासी वाहतूक सुरू होईल. मात्र बसमधून प्रवास करताना प्रवाशांना मास्क आणि सॅनिटायझर लावणं बंधनकारक असेल.

Post a Comment

0 Comments