राज्यव्यापी 'ढोल बजाओ, सरकार जगाओ' आंदोलनाला पंढरीत सुरुवात


पंढरपूर/प्रतिनिधी;

राज्यभर "ढोल बजाव, सरकार जगाव" हे आंदोलन करण्यात येणार असल्याचं आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुकारलेल्या आहे. आंदोलनाची सुरुवात पंढरपूर येथे चंद्रभागा नदी पत्रात विविध मागण्याचे फलक लावून करण्यात आले आहे. 

 राज्यभरात धनगर समाज वेगवेगळ्या पातळ्यांवर हे आंदोलन करेल आणि समाजानेही या आंदोलनाच्या माध्यमातून राज्य सरकारला जागे करावे, ३५० ठिकाणी हे आंदोलन चालू झाले आहे. आरक्षणाच्या मागणीला पुन्हा एकदा सुरुवात झाली असून पंढरपूर या ठिकाणी विठ्ठल मंदिरासमोर स्वतः ढोल वाजवत सरकार विरोधात हे आंदोलन करणार असल्याचे आमदार पडळकर यांच्या नेतृत्वखाली हे आंदोलनाला सुरुवात झाली असल्याची माहिती धनगर समाजाचे नेते सुभाष मस्के यांनी लोकवार्ता शी बोलताना दिली.

भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीमधून राज्य सरकार विरोधात आंदोलनाची हाक दिली आहे. गेल्या दहा महिन्यांपूर्वी सरकार सत्तेत मध्ये आलेले आहे. मात्र, धनगर आरक्षणाच्या बाबतीत एक पाऊलही सरकारने उचललेले नाही, तर भाजपा सरकारने सत्तेत असताना धनगर समाजासाठी एक हजार कोटींची तरतुदी केली होती. मात्र, त्यामधील एक रुपया सुद्धा या सरकारने दिला नाही. याशिवाय धनगर आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक भूमिका ही सरकारकडून घेण्यात आली नाही.

Post a Comment

0 Comments