सर्वांचे लाडके आदरणीय दिलीपबाबा गेले,बाबांनी जीवनाच्या रंगमंचावरून अचानक एक्झिट घेतली,मन सुन्न झाले,आणि बाबांचा जीवनपट मनामध्ये उलगडू लागला. डोक्यावर फरची टोपी, अंगावर सफेद कुर्ता पायजमा, मध्यम शरीरयष्टी,गौरवर्ण,तेजस्वी पाणीदार डोळे ,हसतमुख बोलका चेहरा,पहाडी छाती, कोणताही आव्हान सहजपणे स्वीकारणार त्यांचं बोलणं आणि चालणं बाबा म्हणजे एक चैतन्यशील राजबिंडे व्यक्तिमत्व..राजकीय क्षेत्रात पेठ वडगाव उपनगराध्यक्ष पदाच्या माध्यमातून लोकहिताच्या नवनवीन योजना,उपक्रम राबवून नगरीच्या प्रगतीत मोलाचे योगदान दिले.
ज्ञानाशिवाय या जगात दुसरं काहीही पवित्र नाही, या भावनेनं गोरगरीब शिकला पाहिजे याकरिता शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा बाबांचे योगदान तितकेच स्पृहणीय आहे..बाबांना अध्यात्माची फार आवड श्री महालक्ष्मी देवस्थान ट्रस्ट माध्यमातून महालक्ष्मी मंदिराचा वाढ विस्तार विकास, नवरात्र,दसऱ्या वेळची नगर प्रदक्षिणा पालखी सोहळा, चांदी पालखी सोहळा ,महाप्रसाद असे अनेक धार्मिक उपक्रंमाबरोबरच अध्यात्म आचरणात आणणे याविषयी ते फार जागरूक होते..संगीत हा विषय बाबांच्या फार आवडीचा,अशा कार्यक्रमाचा ते आनंद तर घ्यायचेच आणि कार्यक्रमाचे विश्लेषण ही उत्कृष्ट पद्धतीने करून कलाकारांना दाद आणि प्रोत्साहन द्यायचे, त्यांच्या विषयी आदरभाव व्यक्त करायचे.
_______________________________________
📢
श्री.अमोल संकपाळ मो.९१३०३०१०१८
पहिला मजला, शाहूपुरी ३ गल्ली, पत्की हॉस्पिटल च्या समोर, कोल्हापूर.
(Advertise)
_________________________________________
वेळेबाबत बाबांचा फार कटाक्ष, कोणत्याही कार्यक्रमात वेळेआधी ५ मिनिटं बाबा हजर असायचे. श्री महालक्ष्मी कुकुटपलान, श्री महालक्ष्मी दूधसंस्था, महालक्ष्मी पतसंस्था याद्वारे त्यांनी अनेकांच्या हाताला काम दिले. कृषी क्षेत्राची ही त्यांना फार आवड, शेतीत नवनिर्मिती करणे हा एक छंद ही त्यांनी जोपासला होता. बाबांनी आपल्या आयुष्यात माणसं फार जोडली.त्यांचा लोकसंग्रह फार मोठा.काही दिवस एखादा माणूस दिसला नाही की ते आवर्जून चौकशी करायचे.म्हणूनच बाबा जनतेच्या हृदय सिंहासनावर आरूढ झाले,बाबांच्या अकाली निधनामुळे,राजकीय, शैक्षणिक, अध्यात्मिक, कृषी,सहकार, सांस्कृतिक क्षेत्रातील एका महान व्यक्तिमत्व ला आपण कायमचे मुकलो.बाबा नेहमी म्हणायचे जे काम तुम्ही हातात घेतले आहे,त्यात झोकून द्या ,समर्पित व्हा, यश नक्कीच साध्य होईल. बाबांना तू प्यार का सागर है ,तरी एक बूँद के प्यासे हम हे गाणं फार आवडायचं..बाबा आपल्या प्रती आमच्याही याच भावना आहेत , आपणही एक प्रेमाचा सागर होता.आपल्या आचार विचारांचं पालन करणे हीच आपणास खऱ्या अर्थानं भावपूर्ण आदरांजली ठरेल.
शब्दांकन- प्रमोद झावरे,भानुदास कोळेकर
0 Comments