एक एकर कोथिंबिरीच्या उभ्या पिकात फिरवला नांगर; कारण वाचल्यावर रडू येईल....



नारायणराव :सद्याच्या काळातही शेतकऱ्यांना खूप गोष्टींचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांचे लॉकडाऊनमध्ये खूप हाल झाले आहेत. बाजारभावात मोठी घट झाल्याने शेतकऱ्यांवर कोथिंबीरीच्या उभ्या पिकात नांगर फिरवण्याची वेळ आली आहे.

कोरोनाचे संकट आणि कमी बाजारभाव यामुळे कष्टाने पिकवलेली कोथिंबीर मातीमोल झाल्याने जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील उत्पादक शेतकऱ्यांना खूप मोठा मनस्ताप झाला आहे. कोथिंबीरीच्या एकरी सुमारे ३० हजार रुपये भांडवली खर्च येतो.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणराव उपबाजारात २७ ऑगस्ट २०२० रोजी झालेल्या लिलावात कोथिंबिरीच्या जुडीला ५० रुपये ते ८० रुपयांच्या दरम्यान शेकडा ५ हजार रुपये ते ८ हजार रुपये एवढा भाव मिळाला. सलग आठ ते दहा दिवस कोथिंबिरीच्या जुडीला ३० ते ५० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत होता. 

पावसाळ्यात दर एकरला सात ते आठ हजार जुड्या उत्पन्न निघते. आणि मागील चार दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. कोथिंबिरीच्या शेतात पाणी साठल्याने मुंबई बाजारपेठेत कोथिंबीर सडण्याचे प्रमाण वाढले आहे.

Post a Comment

0 Comments