धरण परिसरात एकाच रात्रीत १०० मिलिमीटर पाऊस : भिमा नदीत १५००० क्यूसेकचा विसर्ग



कुर्डुवाडी/प्रतिनिधी;

उजनी धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे उजनी धरणात येणाऱ्या पाण्यात मोठी वाढ झाली आहे. धरण परिसरात १०० मिलिमीटर इतका पाऊस झाला. त्यमुळे उजनी धरणाचे ११ दरवाजे उघडण्यात आले असून. सध्या भीमा नदीत एकूण १६ हजार ६०० क्‍युसेक विसर्ग सुरू आहे. सातारा जिल्ह्यातील वीर धरणातूनही नीरा नदीत १३ हजार क्‍युसेक पाणी सोडण्यात आले. 

नीरानरसिंग येथे निरा आणि भिमा नदीच्या संगमावर २३ हजार क्यूसेक विसर्ग आल्यामुळे भीमा नदी काठच्या भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्‍यता असल्याने प्रशासनाने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावली. रविवारी रात्री मेघगर्जनेसह सोलापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. जोरदार पावसामुळे उजनीत येणाऱ्या पाण्यात वाढ झाली आहे. सध्या उजनी धरणात दौंड येथून ६  हजार तर बंडगार्ड येथून ७ हजार विसर्ग येत आहे. आज सकाळी धरण १११ टक्के भरले आहे. तर धरणात २२३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

पंढरपूर तालुक्‍यालाही रविवारी रात्री पावसाने झोडपून काढले. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे ऊस पिकाचे नुकसान झाले आहे. पंढरपूर शहरातही मुसळधार पाऊस झाला. चंद्रभागा नदी पात्रात पाणी सोमवारी पर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.
उजनी धरणातील  पाणीपातळी

एकूण पाणीपातळी -   ४९७.२७०० मीटर
एकूण पाणीसाठा  -   ३४७०.३१ दलघमी
उपयुक्त  साठा   -   १६६७.५० दलघमी
टक्केवारी       -   १०९.९१ टक्के
आवक
दौंड विसर्ग      -   ४,९०५ क्यूसेक
बंडगार्डन       -    ५,४३८ क्यूसेक
विसर्ग 
कालवा - २,६०० क्युसेक 
बोगदा  - १,००० क्युसेक 
वीज निर्मिती - १,६०० क्युसेक 
नदी विसर्ग - १५,००० क्युसेक

Post a Comment

0 Comments