अनलॉक-५ : शाळा, चित्रपटगृह सुरू करण्यास परवानगी, पण…


लॉकडाउन वाढवत असतानाच केंद्र सरकारनं अनलॉकच्या ५व्या टप्प्यात चित्रपटगृह व शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. १५ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्याची परवानगी दिली असली, तरी शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्यांकडे सोपवला आहे.करोनामुळे संपूर्ण देश लॉकडाउनच्या बंधनातून जात असून, केंद्र सरकारनं आर्थिक व्यवहार सुरू करण्याबरोबरच विस्कळीत झालेली घडी पूर्वपदावर आणण्यासाठी हळूहळू नियम शिथिल करणं सुरू केलं आहे.

 अनलॉकच्या पाचव्या टप्प्यात केंद्र सरकारनं चित्रपटगृह सुरू करण्यास परवानगी दिली आहे. चित्रपटगृह सुरू करण्यासाठी केंद्र सरकारनं एकूण क्षमतेच्या ५० टक्केच प्रेक्षकांना प्रवेश देण्याचे निर्देश दिले आहेत.

चित्रपटगृह, मल्टिप्लेक्स, थिअटर सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. एकूण क्षमतेच्या ५० टक्के प्रेक्षकांनाच प्रवेश देता येईल. प्रेक्षकांना बसवण्यासंदर्भातील नियमावली माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून जाहीर करण्यात येईल, असं केंद्रानं म्हटलं आहे.

Post a Comment

0 Comments