रोटरॅक्ट तर्फे शिरदवाड येथे प्रतिकारशक्ती मात्रा चे वाटप

कोल्हापूर : शासनाने नेमून दिलेल्या नियमांचे पालन सर्व जण करत आहेत, पण कोरोनाची धास्ती सर्वांच्या मनामध्ये आहेच.
त्यामुळॆ चिंतेचे वातावरण पसरलेले असताना रोट्रॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूर व कै. जे. एस. पाटील चॅरिटेबल ट्रस्ट यांचे वतीने श्री क्षेत्र सिद्धगिरी महा संस्थान कणेरी , श्री अदृष्य काडसिधेश्र्वर स्वामीजी यांच्या आशीर्वादाने आणि बेंगलोर येथील डॉ. के. जे. श्रीधरन यांनी तयार केलेली प्रतिकार शक्ती मात्रा, शिरदवाड ता. शिरोळ  येथे संसर्गापासून बचावासाठी ३०००  मात्रां चे वाटप ग्रामस्थांना करण्यात आले. 

याप्रसंगी रोट्रॅक्ट क्लबचे अध्यक्ष अभिजीत पाटील, सेक्रेटरी मानव गुळवणी, संदेश पाटील, श्रेयस पाटील, सुधांशू रुकडीकर, नमित जैन व ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments