युवा सलामीवीर पृथ्वी शॉ करतोय ‘या’ अभिनेत्रीला डेट?


भारताचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ हा भारतीय क्रिकेटमधील उदयोन्मुख खेळाडूंपैकी एक मानला जातो. शॉ अजूनही टीम इंडियाकडून फारसे सामने खेळलेला नाही, पण त्याने आत्तापर्यंत भारताकडून खेळलेल्या सामन्यांमध्ये त्याने आपली प्रतिभा दाखवून दिली आहे. 

१९ वर्षाखालील क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर शॉ याने निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर त्याने २०१८च्या ICC १९ वर्षाखालील विश्वचषकात भारताला विजय मिळवून दिला. २०व्या वर्षी पृथ्वी शॉ फलंदाजीत दमदार कामगिरी करताना दिसतो आहे. त्याच्या कामगिरीमुळे काही तरूणीही त्याच्या फॅन होताना दिसत आहेत. नुकतीच शॉ याच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवरून तो अभिनेत्री प्राची सिंगला डेट करत असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

पृथ्वी शॉ आणि प्राची दोघांनीही आपल्या नात्याबद्दल कधीही काहीही सांगितलेलं नाही. त्यामुळे ते एकमेकांना डेट करत आहेत की नाही याबद्दल अधिकृत माहिती नाही मात्र सोशल मीडियावरील त्यांच्या कमेंट्स पाहून चर्चांना उधाण आलं आहे.

Post a Comment

0 Comments