कैकडी महाराज मठाचे विश्वस्त रामदास महाराज जाधव यांचे कोरोनामुळे निधन


पंढरपूर/प्रतिनिधी;

राज्यातील वारकऱ्यांच श्रद्धास्थान असलेल्य पंढरपूर येथील कैकाडी महाराज मठाचे विश्वस्त रामदास महाराज जाधव (कैकाडी) (वय-७७) यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. अकलूज येथील एका हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच रामदास महाराज यांची प्राणज्योत मालवली. 
२२ सप्टेबर रोजी रामदास महाराज जाधव यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली होती. कोरोना चाचणीत त्यांना लागण झाल्याचे निष्पन झाले. 
 
वारकरी संप्रदायात त्यांना मानाचं स्थान होतं. पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे माजी सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले होते. कैकडी महाराज मठकडून विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहे. 
रामदास महाराज हे कैकाडी महाराजांचे पुतणे होतं. तेच कैकाडी मठाचं व्यवस्थापन पाहत होते. विशेष म्हणजे रामदास महाराज मठाची जन्मकथा व तिचा उद्देश प्रभावीपणे सांगतय मठात वर्षभर विविध कार्यक्रम साजरे होत असतात.

Post a Comment

0 Comments