३२ वर्षानंतर लोकप्रियता टिकून राहिलेला भन्नाट चित्रपट "अशी हि बनवाबनवी"

३१ वर्षे झाली तरी काही चित्रपटांची लोकप्रियता तसूभरही कमी होत नाही. अनेक वर्षांनंतरही तो चित्रपट पाहिला तरी कंटाळा येत नाही. असाच एक चित्रपट म्हणजे ‘अशी ही बनवाबनवी’. या चित्रपटाला मराठी चित्रपटसृष्टीतील एक सोनेरी पान मानलं जातं. हा चित्रपट अनेकदा पाहिला तरी मन भरत नाही आणि कंटाळाही येत नाही.


कोणताही चित्रपट लोक काहीच वर्षांत विसरून जातात. एखादा चित्रपट प्रेक्षकांच्या इतक्या वर्षं स्मरणात असल्याचे खूपच कमी चित्रपटांच्या बाबतीत घडते. आजही अशी ही बनवाबनवी तितक्याच आवडीने पाहिला जातो.

__________________________________________📢

(Advertise)

__________________________________________

तसेच नव्या पिढीला देखील हा चित्रपट तितकाच आवडत आहे. एक दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांना काय दाखवायचे यावर सचिन चित्रीकरणाच्या वेळीच ठाम होता. त्याने प्रत्येक गोष्ट इतक्या चपखलपणे बसवल्यामुळेच प्रेक्षकांना हा चित्रपट प्रचंड आवडला. लक्ष्मीकांत बेर्डे, सुशांत रे, सचिन पिळगांवकर, अश्विनी भावे, प्रिया अरुण, निवेदिता सराफ आणि सुप्रिया पिळगांवकर यांसारखे चांगले कलाकार या चित्रपटाद्वारे एकत्र आले होते. चित्रपटाच्या सेटवर आमचे खेळीमेळीचे वातारण असायचे. आम्ही सगळेच आजही या चित्रपटाच्या प्रेमात आहोत. 

हा चित्रपट अनेकदा पाहिला तरी मन भरत नाही आणि कंटाळाही येत नाही.

Post a Comment

0 Comments