राकेश करमळकर/आजरा:
अशोक अण्णा चराटी यांच्या मार्गदर्शनाखाली,भुदरगड आजरा राधानगरी चे आमदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नाने नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आजरा शहराच्या पाणी पुरवठा योजनेला हिरवा कंदील दाखवला आहे. याबाबतचे मुंबई येथे झालेल्या बैठकीत नळ पाणीपुरवठा योजनेला मंजुरी देण्यात आली आहे अशी माहिती आजरा नगरपंचायत च्या सभागृहांमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये उपनगराध्यक्ष विलास नाईक व अशोक अण्णा चराटी यांच्याकडून देण्यात आली.
सुमारे ३८ वर्षापूर्वी ३०० जोडण्यासाठी चालू केलेली ही पाणी योजना आता जीर्ण झाली आहे.आजरा शहराची वाढती उपनगरे, व लोकसंख्या पाहता सध्याची पाणी योजना तोकडी पडत आहे सुमारे ६० पाळ्यांमध्ये सध्या शहराला पाणी सोडायचे काम चालू आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांवरही ताण पडत आहे. ही अत्याधुनिक पाणी योजना कार्यान्वित झाल्यानंतर आवंडी वसाहत, राईस मिल, जुने कोर्ट, दारवाजकर कॉलनी येथे नवीन जलकुंभ उभारण्यात येणार आहेत. पाच झोन तयार करून संपूर्ण शहराला अवघ्या पाच तासात शुद्ध व मुबलक पाणीपुरवठा केला जाणार आहे. पुढील काळात दलित वस्त्यांमध्ये मोफत पाणी देण्याचा नगरपंचायतीचा प्रयत्न आहे.
५ मे रोजी शासन दरबारी झालेल्या निर्णयानुसार यानंतर कोणतेही योजनेस मान्यता देणार नाही असे परिपत्रक लागू करण्यात आले आहे.परंतु आजरा नगरपंचायतीने मार्च महिन्यांमधील २० तारखेला झालेल्या सभेमध्ये तांत्रिक मंजुरी घेतल्यामुळे या योजनेस मंजुरी देण्यात आली असे अशोक अण्णा चराटी यांनी सांगितले. ही योजना पूर्व होण्याचे श्रेय अशोक अण्णा चराटी यांचे आहे असे उदगार विलास नाईक यांनी काढले आमदार प्रकाश अबिटकर यांच्या प्रयत्नाने व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेस मंजुरी दिल्याबद्दल उपनगराध्यक्ष विलास नाईक यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी बैठकीस नगराध्यक्षा जोत्स्ना चराटी, संजीवनी सावंत, सुमय्या खेडेकर, अस्मिता जाधव, बाळ केसरकर, रेश्मा सोनेखान ,सीमा पोवार, आनंदा कुंभार, सिकंदर दरवाजकर तर किरण कांबळे यांनी आभार मानले.
0 Comments