मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे प्रचंड चर्चेत आहे. त्यातच मुंबई ही मला पाकव्याप्त काश्मीर सारखी का वाटतेय अस म्हणून तिने मुंबईची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने कंगनाच्या अनधिकृत कार्यालयावर मुंबई महापालिकेने कारवाई केली होती.
त्यानंतर आपल्या कार्यालयात झालेलं नुकसान पाहण्यासाठी मुंबईत आलेली कंगना आता चार दिवसानंतर पुन्हा एकदा आपल्या गावी मनाली येथे जात आहे. त्यातच मुंबई सोडताना मुंबई बद्दल वक्तव्य करत कंगनाने पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
“मी अत्यंत जड अंत:करणानं मुंबईचा निरोप घेत आहे. माझी निंदा नालस्ती केली गेली, ऑफिसपाठोपाठ माझं घर तोडण्याचा प्रयत्न झाला. सुरक्षारक्षकांचा पहारा माझ्याभोवती ठेवावा लागला. ज्याप्रकारे मला दहशत दाखवण्यात आली ते बघता पाकव्याप्त काश्मीरची तुलना वर्मी लागली असंच म्हणावं लागेल.” मुंबई सोडताना कंगनाने अस ट्विट केलं आहे. या ट्विटद्वारे तिने पुन्हा एकदा आपल्या टीकाकारांवर निशाणा साधला आहे. तिचं हे ट्विट सध्या वायरल झालं आहे.
0 Comments