उडदाचे दर झटक्यात दीड हजारांने कमी; शेतकरी हवालदिल


बार्शी/प्रतिनिधी; उडदाला हमीभावापेक्षा जास्त दर असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र शेतकऱ्यांचा विक्रीसाठी बाजारात आला की दीड हजार ते अठराशे रुपये उतरल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे शासनाने गांभीर्याने दखल घेऊन शेतकऱ्यांचे होणारे नुकसान थांबवावे अशी मागणी होत आहे.

 यंदाच्या वर्षी पाऊस वेळेत वेळ पडल्याने खरीप हंगामातील सगळेच पिके जोमात आहेत चालू वर्षी उडदाची विक्रमी उत्पन्न होत आहे, बार्शी बाजार समितीत उडदाची आवकही मोठ्या प्रमाणात आहे, पाऊस पडल्यामुळे उडदाला उताराही चांगला आहे. शासनाने ठरवून दिलेल्या  किमान आधारभूत किंमत ६००० असतानाही सुरुवातीला साडे ६५०० क्विंटल दराने उडीद विक्री झाली, त्यानंतर सहा दिवसातच भाव पाच हजाराच्या घरात येऊन असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. 

शेतकऱ्यांनी काय करायचे.? व्यापाऱ्यांमध्ये संगणमत झाले आहे का? असे अनेक अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनावर निर्माण झाले आहेत शासनाने याची दखल घेऊन शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळावे अशी मागणी शेतकर्‍यांतून होत आहे.

Post a Comment

0 Comments