सर्वच आरक्षण रद्द करा : छत्रपती उदयनराजे



मराठा समाजातील तरुणांना चांगले गुण मिळूनसुद्दा प्रवेश मिळत नाही, तर दुसरीकडे कमी गुण मिळूनही इतर समाजातील मुलांना प्रवेश मिळतो. समाजातील सर्व आरक्षण रद्द करा आणि सरसकट मेरिटनुसार आरक्षण द्या, अशी मागणी खा. उदयनराजे भोसले यांनी केली आहे. 
_________________________________________
📢
(Advertise)
__________________________________________

मराठा आरक्षण अंमलबजावणीस सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे महाराष्ट्रात मराठा समाज आक्रमक झाला आहे. याच पार्श्‍वभूमीवर खासदार उदयनराजे यांनी हे मोठे वक्‍तव्य केले आहे. यावेळी बोलताना उदयनराजे म्हणाले की, मेरिटवर आरक्षण द्यावं आणि सगळेच आरक्षण रद्द करावं. 

ज्याने कष्टच घेतले नाही, त्याला आरक्षणामुळे प्रवेश मिळतो आणि ज्याने कष्ट घेतले; पण आरक्षण नाही म्हणून त्यांना प्रवेश मिळत नाही. त्या तरुणांचं मानसिकद‍ृष्ट्या खच्चीकरण होऊन पदरी नैराश्य येते. काहीजण आत्महत्यादेखील करतात, अशी खंतही उदयनराजे यांनी व्यक्‍त केली आहे.

Post a Comment

0 Comments