महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे आज गुणदान पद्धतीमध्ये बदलाचे नवे परिपत्रक जारी करण्यात आले. यानुसार आता राज्यसेवा पूर्व परिक्षेसहित सर्वच परिक्षांकरिता एकच नकारात्मक गुणदान पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे.
पूर्वीच्या पद्धतीनुसार राज्यसेवा पूर्वपरीक्षा मध्ये १/३ या प्रकारची नकारात्मक गुण पद्धती होती. आता आयोगाच्या सर्वच वस्तुनिष्ठ प्रकारच्या परिक्षांकरिता १/४ हीच गुणदान पद्धत अवलंबली जाणार आहे.
0 Comments