सोलापुर जिल्ह्यात संचार बंदीच्या काळात जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे उलंघन करणे, मास्क न वापरणे, दुचाकीवर मर्यादेपक्षा अधिक लोकांनी प्रवास करणे, चार चाकी वाहनांचा विना परवाना वापर करणे, मर्यादेपेक्षा तसेच परवाना नसताना प्रवास करणे, निर्धारित वेळे नंतर दुकाने सुरु ठेवणे, सामाजिक आणि शारिरिक आंतर न पाळणे अशा अनेक कारणासाठी जिल्ह्यातील तसहील, नगरपालिका, महापालिका आणि पोलिसांनी कारवाई केली असून यामध्ये जवळपास तीन कोटीचा दंड वसुल केला आहे.
जिल्ह्यात वाढत चाललेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणेसाठी जिल्हाधिकार्यांनी काढलेल्या आदेशाचे उलंघ्घन करणार्यांवर करण्यात आलेल्या कारवाईत शहर व जिल्ह्यात जवळपास एक कोटी ६५ लाख ९४ हजार ४७० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.
६ जुलै ते १५ सप्टेंबर दरम्यान करण्यात आलेल्या कारवाईत जिल्ह्यातील विविध तहसील कार्यालयांनी १७,००७ केसेस दाखल केल्या असून त्यांच्याकडुन जवळपास २३ लाख ७१ हजार ५०० रुपंयाचा दंड वसुल केला आहे. तर सर्व नगरपालिका कार्यालयाकडे ५०६३ केसेस दाखल झाल्या आहेत त्यांच्याकडून ६८ लाख ६ हजार ३३० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने ग्रामीण भागात विविध ठिकाणी जवळपास ८८६३७ जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून १ कोटी २० लाख २४ हजार ६५० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. तर महापालिका हद्दीत ७१५० जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून जवळपास १५ लाख ११ हजार ९९० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला असल्याची माहिती करमणूकर उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.
0 Comments