टेंभुर्णी जवळ पुणे-सोलापूर महामार्गावरती लूटमार करणारे आरोपी जेरबंद



पुणे सोलापूर महामार्गवरती दिनांक ३० रोजी रात्री १.३० च्या सुमारास वरवडे टोलनाक्या पासून टेम्भुर्णी बाजूस २ किमी अंतरावर रोडवर मालट्रक युपी ७० जीटी ७३५३ मधून सांगोला येथून डाळिंब भरून घेऊन येत होता. मार्केट यार्डकडे येत असताना समोर थांबलेल्या कार चालकास रस्ता बरोबर आहे का? असे विचारले त्याने बरोबर आहे असे सांगितले, त्यानंतर फिर्यादी त्याचे मालट्रकमध्ये येऊन बसला व तो ट्रक चालू करून जात असताना सदर कारमधून चौघेजन उतरून मालट्रकच्या दोन्ही बाजुने दोघे-दोघेजन येऊन मालट्रक मध्ये चढले व एक इसम त्याच्या कार जवळ उभा होता.

ट्रकमध्ये चढलेल्या चौघांनी फिर्यादी व जखमी साक्षीदार यांना मारहाण करून जखमी केले. फिर्यादीच्या गळ्यास चाकू लावून त्याचे खिशातून ३८ हजार रुपये व ५ हजार  मोबाईल असा एकूण ४३हजार रुपये किंमतीचा ऐवज जबरदस्तीने काढून घेऊन चोरी केला व कार मध्ये बसून निघून गेले, असा टेंभुर्णी पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याच्या घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारीडॉ.विशाल हिरे यांनी भेट दिली असून सदर गुन्ह्याच्या तपास सूचना दिल्या आहेत, सदर गुन्ह्यातील आरोपीचा मिळालेल्या माहितीनुसार सदर गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करून पोलिसांनी शोध घेऊन आरोपी रोहन देविदास ढवळे-वय २०, रणजित बलभीम ढवळे-वय २३, महादेव विठ्ठल ढवळे-वय २४ सर्व रहाणार दगड अकोले  ता माढा जि सोलापूर, सोहम विठ्ठल मस्के -वय २०, राहणार शेवरे ता माढा जि सोलापूर, तसेच सुरज तुकाराम महाडिक-वय १९ राहणार माळेगाव ता माढा जि सोलापूर सदर आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली आहे.सदर आरोपी कडून गुन्ह्यात वापरलेल्या दोन स्विफ्ट  या गाड्या पोलीस प्रशासनाने जप्त केल्या आहेत.सदर घटनेचा पुढील तपास टेम्भुर्णी पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments