चोरीचा रचला बनाव....
बार्शी : बार्शी तालुक्यातील वांगरवाडी येथे चोरीचा बनाव करुन ९ महिन्याच्या पोटच्या गोळ्याचे स्वत:च्या हाताने निर्दयी आईनेच चार्जर वायरने बाळाच्या गळ्याचा घोट घेतल्याचे पोलिसात तपासात उघड झाले आहे आरोपी आई अश्विनी स्वानंद तुपे (वय २३ रा वांगरवाडी ) हि आरोपी असल्याचे सिद्द झाले, असल्याची माहीती पोलिस उपअधिक्षक डॉ सिध्देश्वर भोरे सपोनि शिवाजी जायपात्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली या घटनेत ९ महिन्याचा सार्थक स्वानंद तुपे यांची हत्या झाली आहे .
याबाबत अधिक माहीती की दि २२ ऑगस्ट रोजी गणेश अगमना दिवशी भरदिवसा घरामध्ये घुसून कोणीतरी चोरीच्या उद्देशाने आलेल्या अनोळखी व्यक्तीने पाळण्यामध्ये झोपलेल्या नऊ महिन्याच्या चिमुरडयाचा मोबाईल चार्जर वायरने गळा आवळून हत्या केल्याची फिर्याद मयत सार्थक चे चुलते आनंद राजेंद्र तुपे यांनी तालुका पोलिसात फिर्याद दिली होती
याबाबत माहिती अशी की घटनेची गांभिर्य ओळखून सदर गुन्ह्याचे घटनास्थळी पोलीस अधीक्षक मनोज पाटील अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे उपविभागीय पोलिस अधिकारी सिद्धेश्वर भोरे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे यांनी घटनास्थळी भेट देऊन सदरचा गुन्हा अत्यंत गुंतागुंतीचा व किचकट स्वरूपाचे असल्याने तपासाच्या अनुषंगाने घटनास्थळाचे आजूबाजूचे साक्षीदारकडे चौकशी केली .
यादरम्यान गोपनीय खबऱ्याकडून एका साक्षीदाराकडे विचारपूस केली असता प्रथम त्यांनी उडवाउडवीची उत्तर दिले हत्ये पाठीमागचा उद्देश समजून आला नाही.
0 Comments